Posted in

“समरजित घाटगे भाजपमध्ये परतणार? राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण!”

कागल विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे पराभूत उमेदवार समरजित घाटगे लवकरच भाजपमध्ये पुनरागमन करणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरू लागल्या आहेत. भाजपच्या वरिष्ठ पातळीवर यासंदर्भात सकारात्मक संकेत मिळाले असून, त्यांचा पक्षप्रवेश लवकरच होण्याची शक्यता आहे, असे सूत्रांकडून सांगितले जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे नेते हसन मुश्रीफ यांच्या विरोधात लढलेल्या समरजित घाटगे यांना नुकताच विधानसभा निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला. मात्र, त्याआधी ते भाजपचे निष्ठावान नेते होते आणि तब्बल वर्षभरापूर्वीपर्यंत भाजपचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यरत होते. त्या काळात केंद्र आणि राज्यातील अनेक मोठ्या नेत्यांनी त्यांच्या निवासस्थानी भेटी दिल्या होत्या. मात्र, महायुतीत अजित पवारांच्या प्रवेशानंतर हसन मुश्रीफ यांना कागलमधून संधी देण्यात येणार असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळेच घाटगे यांनी शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला.

समरजित घाटगे यांच्या राष्ट्रवादी (शरद पवार गट) प्रवेशाचा जंगी कार्यक्रम खुद्द शरद पवार यांच्या उपस्थितीत कागलमध्ये पार पडला होता. पवार आणि त्यांच्या पक्षातील दिग्गज नेत्यांनी हसन मुश्रीफ यांना पराभूत करण्यासाठी जोरदार प्रयत्न केले. पवार यांच्या भगिनी सरोज पाटील यांनी तर थेट जाहीर सभेतून “मुश्रीफ यांना पाडा” असे आवाहन केले होते, ज्याची राज्यभर चर्चा झाली. मात्र, या साऱ्या प्रयत्नांनंतरही हसन मुश्रीफ मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. या पराभवानंतर घाटगे पुढे काय करणार, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू असतानाच त्यांच्या भाजपमधील पुनरागमनाच्या शक्यतेने नवा राजकीय पेच निर्माण केला आहे.

पंधरवड्यापूर्वी शरद पवार यांच्या कोल्हापूर दौऱ्यात समरजित घाटगे त्यांच्यासोबत अनेक कार्यक्रमांत सहभागी झाले होते. त्यामुळे ते भाजपमध्ये पुनरागमन करणार नाहीत, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, गेल्या आठवड्यात त्यांच्या भाजप प्रवेशाबाबत हालचाली वेगवान झाल्याचे सूत्रांकडून समजते. त्यामुळे घाटगे यांच्या भविष्यातील राजकीय वाटचालीबाबत नव्या चर्चांना उधाण आले आहे.