मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने नाराज असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ ओबीसी समाजाच्या संघटनांच्या सभा आणि बैठकांमध्ये सक्रिय आहेत. एकीकडे, छगन भुजबळ अजित पवार यांच्यावर टीका करत असून त्यांची नाराजी व्यक्त करत आहेत, तर दुसरीकडे, भुजबळ मोर्चेबांधणी करताना दिसत आहेत. यावर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते स्पष्ट प्रतिक्रिया देत आहेत.
मंत्रिमंडळात भाजपाच्या वाट्याचे एक मंत्रीपद रिक्त असल्यामुळे नाराज असलेले छगन भुजबळ भाजपामध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. यासाठी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी ०८ ते १० दिवसांच्या आत पुन्हा भेटून यावर समाधानकारक तोडगा काढण्याचे आश्वासन दिले आहे. छगन भुजबळ यांनी याबाबतची माहिती स्वतः दिली. याशिवाय, अजित पवार गटाचे मंत्री नरहरी झिरवाळ यांनी भुजबळ यांच्या नाराजीवर महत्त्वपूर्ण वक्तव्य केले आहे.
नरहरी झिरवाळ यांनी छगन भुजबळ यांच्या नाराजीबद्दल माहिती दिली. त्यांनी सांगितले की, “छगन भुजबळ नाराज असताना मी त्यांना भेटलो आणि ते म्हणाले की, त्यांना मिळालेली वागणूक योग्य नाही. मी त्यांना सांगितले की, तुम्ही आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहात, कृपया वेगळा निर्णय घेऊ नका. राज्यसभा देण्यावर चर्चा आहे, असे मी बोललो, परंतु त्यावर भुजबळांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. “समाजात आता वातावरण तणावपूर्ण झाले आहे, आणि भुजबळ यांनी असे सांगितले की, त्यांना आता राज्यसभेवर पाठवले जाण्याची योजना आहे.”
दरम्यान, छगन भुजबळांच्या नाराजीचा प्रभाव राज्यभरात दिसून येत आहेत. “जहाँ नहीं चैन, वहाँ नहीं रहना,” असे त्यांनी सूचक वक्तव्य केले आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे की, छगन भुजबळ काही वेगळा निर्णय घेणार का.