संसद परिसरात अमित शाह यांच्या बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भातील वक्तव्यावरून आज मोठा हंगामा झाला. राहुल गांधी व त्यांच्या खासदारांना संसदेत प्रवेश करण्यापासून रोखणाऱ्या भाजपाच्या खासदारांना राहुल गांधी यांनी धक्का दिला, ज्यामुळे भाजपाचे दोन खासदार जखमी झाले. यामध्ये खासदार प्रताप सारंगी हे खाली पडल्याने जखमी झाले. राहुल गांधींनी या प्रकरणी भाजपावर आरोप केला की, आंदोलन करणाऱ्या प्रियांका गांधी व मल्लिकार्जुन खर्गे यांना भाजपाने वाईट वागणूक दिली आणि त्यांना संसदेत प्रवेशापासून रोखण्याचा प्रयत्न केला. यावर भाजपा राहुल गांधीविरोधात एफआयआर दाखल करण्याची तयारी करत आहे.
दिल्लीतील आरएमएल हॉस्पिटलमध्ये भाजपाचे खासदार प्रताप सारंगी आणि अन्य एका खासदाराला दाखल करण्यात आले आहे. प्रताप सारंगी यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर राहुल गांधी यांचा केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी तीव्र शब्दांत धिक्कार केला आहे.
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी राहुल गांधीवर टीका करत म्हटले की, रिजिजू यांनी राहुल गांधीवर आरोप करत म्हटले की, त्यांची वर्तवणूक संसदेत असह्य आणि असंवेदनशील होती. संसद शारीरिक ताकद दाखविण्याचे ठिकाण नाही. जर प्रत्येकाने आपली ताकद दाखवायचीच ठरवली, तर संसद कशी चालेल? संसद ही लोकशाहीचे मंदिर आहे, कुस्तीचे मैदान किंवा बॉक्सिंगचे आखाडे नाही.
धक्काबुक्कीच्या प्रकरणानंतर भाजपा आक्रमक झालेली आहे. राहुल गांधी यांनी भाजपाचे खासदारांना धक्का दिल्याचा आरोप होत असून, या घटनेचे व्हिडीओ शोधले जात आहेत. जर व्हिडीओमध्ये राहुल गांधींचा धक्का देण्याचा आरोप सत्य ठरला, तर भाजपाने त्यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्याची तयारी केली आहे, अशी माहिती सूत्रांनी आजतकला दिली आहे.
संसदेत झालेल्या धक्काबुक्कीच्या प्रकरणावर प्रतिक्रिया व्यक्त करत, भाजपाचे खासदार प्रताप सारंगी यांनी सांगितले की, ते संसदेच्या पायऱ्यांवर बाजूला उभे होते. त्यावर राहुल गांधी यांनी आरोप फेटाळले असून, दावा केला की, संसदेत जात असताना भाजपाच्या खासदारांनी धक्का दिला आणि धमकी दिली. त्यांनी मल्लिकार्जुन खर्गे यांनाही धक्का दिला असल्याचा आरोप केला. राहुल गांधी यांनी स्पष्ट केले की, धक्काबुक्की केल्याने आम्हाला काहीही फरक पडत नाही, कारण सर्व काही कॅमेऱ्यात कैद झाले आहे, असे त्यांनी म्हटले.