Posted in

“‘दादाचा वादा म्हणजे काय, मी लल्लूपंजू आहे का?’; छगन भुजबळांचा अजित पवारांना तिखट सवाल”

रविवारी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाला, ज्यामध्ये अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली, तर काही अनुभवी नेत्यांचा पत्ता कट करण्यात आला. यामध्ये राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना थेट सवाल केला आहे.

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यानंतर आपली नाराजी व्यक्त केली आहे. “मला मंत्री पद मिळालं नाही म्हणून अजित दादांना काही लोकांनी धन्यवाद दिले. अनेक वेळा मंत्रीपद मिळालं, त्यामुळे आता त्यात वाद नाही.” मी महसूल मंत्री म्हणून पहिल्यांदा काम केले, परंतु त्यावरून पक्षांमध्ये भांडणं सुरू झाली आहेत. विरोधी पक्षनेते असताना पवारांच्या अपेक्षेपेक्षा जास्त काम केल आहे.

1999 मध्ये काँग्रेस एकत्र असती, तर मी मुख्यमंत्री झालो असतो. सोनिया गांधीसह अनेक लोकांचे फोन मला आले होते, ज्यांनी मला काँग्रेस सोडू नकोस आणि मुख्यमंत्री होण्याचं आश्वासन दिलं होतं. परंतु मी शरद पवारांसोबत राहण्याचा निर्णय घेतला. राष्ट्रवादीची स्थापना झाली त्या वेळी पार्टीत केवळ मी आणि शरद पवार होतो. त्याचबरोबर, मुंबईतील दहशतवादाच्या संकटाच्या वेळी मी गृहमंत्री होतो. तेव्हा बच्चन आणि शाहरुख खान मुंबई सोडण्याचा विचार करत होते, पण मी त्यांना थांबवले आणि मुंबईतील दहशत थोपवली. असं भुजबळ यांनी सांगितल आहे.

दरम्यान, छगन भुजबळ यांनी सांगितले की, होळीच्या दिवशी अजित पवार यांनी रस्त्यातून बोलावून लोकसभा निवडणूक लढवायला सांगितलं. मी लोकसभा निवडणूक लढण्यास नकार दिला, तेव्हा अजित पवारांनी लगेच स्पष्ट केले पाहिजे होते. “मी काय दूध पितो का? मी लहान बाळ आहे का? मला समजत नाही का?”

साताऱ्याची जागा भाजपला सोडल्यामुळे एक राज्यसभा सीट मिळाली होती, परंतु अजित पवार यांनी दिलेल्या शब्दाचा काय उपयोग झाला? शरद पवार यांनी नेहमी चर्चेतून निर्णय घेतले आहेत, पण यावेळी काहीही चर्चा केली गेली नाही. आठ दिवसांपूर्वी समीर भाऊ पटेल यांनी मला बोलावून घेतलं आणि सांगितलं की भुजबळांना राज्यसभेवर पाठवण्यात येईल. मकरंद पाटील यांना मंत्री करण्यासाठी त्यांना राज्यसभा पाठवायचं का? मी काही लल्लू-पंजू आहे का? “जर माझी किंमत नाही, तर मी काय करायला पाहिजे?”काय तर म्हणे दादाचा वादा! अस भुजबळ म्हणाले.