Posted in

“अजित पवार दिल्लीत, शिंदे मुंबईत; फडणवीसांनी स्पष्ट केली परिस्थिती”

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. या भेटीनंतर फडणवीस यांनी सांगितले, “मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पंतप्रधान, राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतींशी भेट घेणे एक पद्धत आहे. आज सकाळी पंतप्रधानांबरोबर महाराष्ट्रासंदर्भात दीर्घ चर्चा झाली. तसेच त्यांचे आशीर्वाद घेतले.” पंतप्रधान मोदी म्हटले की, “महाराष्ट्र देशातील महत्त्वाचे राज्य आहे आणि देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी ते गतीशील ठेवणे आवश्यक आहे.”

देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले, “मी आमच्या पक्षाचे नेते जे.पी. नड्डा, अमित शाह, नितीन गडकरी आणि राजनाथ सिंह यांची भेट घेतली आहे. रात्री मंत्रिमंडळ विस्ताराबाबत जे.पी. नड्डा आणि अमित शाह यांच्यासोबत चर्चा केली.” मंत्रिमंडळाचा तिढा सुटला आहे का? या प्रश्नावर फडणवीस म्हणाले, “मंत्रिमंडळाचा तिढा नाही. अजित पवार दिल्लीत कामासाठी आले आहेत, मी माझ्या कामासाठी आणि एकनाथ शिंदे मुंबईत आहेत. आम्ही दिल्लीत असं काही नाही. माझी आणि अजितदादांची कालपासून भेट झालीच नाही.

“मी माझ्या नेत्यांची भेट घेण्यासाठी दिल्लीत आलो आहे. आमच्या पक्षाकडून मंत्रीपद कोणाला मिळू शकते, यावर चर्चा झाली. अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या मंत्र्यांचा निर्णय तेच घेतील. आमच्या पक्षाच्या मंत्र्यांबाबत पार्लमेंटरी बोर्ड निर्णय घेईल.” अस देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. काल रात्री दिल्लीत झालेल्या बैठकीत फडणवीस, अजित पवार, जे.पी. नड्डा आणि अमित शाह उपस्थित होते, परंतु फडणवीस यांनी स्पष्ट केलं की अजित पवार या बैठकीत नव्हते.