Posted in

“करेक्ट कार्यक्रम’वरून अजित पवारांचा जयंत पाटलांवर टोकदार टोला, म्हणाले ‘कधीतरी…'”

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना “टप्प्यात आलं की करेक्ट कार्यक्रम” या प्रसिद्ध डायलॉगवर डिवचले आहे. निवडणुकीच्या निकालानंतर ईव्हीएमवरील संशयावर बोलताना अजित पवारांनी माळशिरस येथील मारकडवाडीत सुरू असलेल्या आंदोलनाचीही उल्लेख केला. हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांनी विधिमंडळाचे विशेष अधिवेशन सुरू असताना भाजप नेते राहुल नार्वेकर यांच्या विधानसभेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवडीबद्दल अभिनंदन व्यक्त केले.

अजित पवार यांनी निवडणुकीच्या काळात अनेक नेत्यांनी स्टेजवर संविधान हातात घेतल्याचा मुद्दा उपस्थित केला. त्यांनी विचारले की, ज्यांच्या हाती संविधान नाही, त्यांना आदर मिळत नाही का? अनेक लोकांनी संविधानातील तरतुदी वाचल्याच नाहीत? शपथ घेण्याची प्रक्रिया नियमात असल्याचं सांगितलं तसेच स्टंटबाजी करणे हे निरर्थक आहे, असेही ते म्हणाले.

अजित पवार यांनी ईव्हीएम आरोपांवरून विरोधकांवर टीका करत सांगितले की, “आमची बाजू खरी आहे, हे नागपूर अधिवेशनात दाखवून देऊ. लोकसभेतील आमच्या जागा कमी आल्यावर आम्ही रडलो नाही. 31 जागा मिळाल्यावर विरोधकांनी ईव्हीएमच्या गारगार वाजण्याचे आरोप केले, पण आता तेच ईव्हीएम गार वाटतं की गरम, हे त्यांचं त्यांनाच पाहायचं आहे.”

तसेच राहुल नार्वेकर यांची विधिमंडळाच्या अध्यक्षपदी निवड झाली असून, अजित पवार यांनी त्यांचे अभिनंदन केले. पवार म्हणाले, “सर्व सदस्यांचे अभिनंदन. माझ्या राजकीय कारकिर्दीला ३५ वर्षांपूर्वी सुरुवात केली होती, तेव्हा जयंत पाटील आणि आर आर पाटील आमच्यासोबत होते. राहुल नार्वेकर यांचा राजकीय प्रवास शिवसेनेतून सुरू झाला. मोदी साहेबांच्या लाटेत, ‘मी मी’ म्हणणारे पराभूत झाले. तुम्ही विधानपरिषदेत चांगले काम करत होतात आणि आता तुम्ही अध्यक्षपदी निवडले गेलात, हे भाजपमुळे शक्य झालं. महाराष्ट्र विधानसभा देशाला दिशा देणारी आहे,” असं म्हणत अजित पवार यांनी नार्वेकरांचे अभिनंदन व्यक्त केले.