पुणे: सध्या विधानसभा निवडणुकीचा प्रचार ऐन भरात आला आहे. यातच महायुतीचे उमेदवार सुनील शेळके यांचा मतदारसंघात सध्या जोरदार प्रचार सुरू आहे. अपक्ष उमेदवार बापू भेगडे यांनीही मतदारसंघात जोरदार प्रचार सुरू केला आहे. आशातच सुनील शेळके यांच्यासाठी लोणावळ्यात काढण्यात आलेल्या प्रचार रँलीत मोठा प्रतिसाद दिसत आहे. या प्रचार रँलीचा धसका विरोधकांनी घेतल्याचा दिसून येत आहे. त्यामुळे शेळके यांना घेरण्याचा प्रयत्न सुरू झाला असल्याची मतदारसंघात सुरू आहे.
मावळात सुरूवातीपासून उमेदवारीवरून मोठा गोंधळ बघायला मिळाला. मात्र महायुतीत ही जागा सुनील शेळके यांना मिळाली. त्यामुळे बापू भेगडे यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज सादर केला. यातच आता सर्व विरोधक एकत्र येत सुनील शेळके यांना घेरण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून मावळात प्रचार शिगेला पोहचला आहे. यात शेळकेंच्या प्रचार रँलीला जनतेचा उत्सुर्फ प्रतिसाद मिळत आहे. यामुळेच त्यांच्यावर गुन्हे दाखल करा. अशी मागणी केली जात आहे.
दरम्यान, सुनील शेळके यांच्यासाठी महायुती मधील सर्व घटकपक्ष मतदारसंघात जोरदार कामाला लागले आहेत. यातच देवेंद्र फडवणीस यांच्या आदेशानुसार आता भाजप पदाधिकाऱ्यांमधील नाराजी देखील दूर झाली आहे. यासह राष्ट्रवादी अजित पवार गट देखील शेळके यांच्यासाठी मैदानात उतरला आहे. दुसऱ्या बाजूला अपक्ष उमेदवार बापू भेगडे यांना महाविकास आघाडीचा पाठिंबा आहे. मात्र बापू भेगडे आमदार म्हणून निवडून आल्यास कोणत्या पक्षात जाणार ? याबाबत शंका उपस्थित केली जात आहे. त्यामुळे या मतदारसंघात कोण बाजी मारणार ? ते पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.