पुणे: कोथरूड विधानसभा मतदारसंघातील भाजपा- महायुतीचे उमेदवार मा. चंद्रकांतदादा पाटील यांची मतदारसंघातील प्रतिमा ही शब्द पाळणारा आमदार अशी झाली आहे. मतदारसंघातील प्रश्न घेऊन जर कोणी चंद्रकांतदादांना भेटले तर त्यांनी दिलेला शब्द हा अंतिम असतो, आणि तो पाळला जातो याची प्रचिती प्रत्येकाला येते. प्रश्न कोणताही असो, चंद्रकांतदादांनी शब्द दिला, म्हणजे तो शंभर टक्के पाळला जाणार, याची प्रत्येकालाच खात्री असते.
गेल्या निवडणुकीच्या वेळी डीपी रोडवरील आशिष गार्डन येथील अतिक्रमणाचा मुद्दा प्रचंड गाजला होता. त्यावेळी नागरिकांनी प्रशासनाला चांगलेच धारेवरही धरले होते. या अतिक्रमणामुळे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडीला तोंड देण्याची वेळ नागरिकांवर आली होती. मुख्य म्हणजे, हे अतिक्रमण काढण्यामध्ये कोणालाही यश येत नसल्याचे स्पष्ट झाले होते. अशातच निवडणूक आली आणि या परिसरात असलेल्या अनेक सोसायटीमधील मतदारांनी थेट मतदानावर बहिष्कार टाकण्याची भूमिका घेतली आणि तसा इशाराही देऊन टाकला.
चंद्रकांतदादा पाटील यांनी या सोसायटीमध्ये नागरिकांची भेट घेऊन निवडणूक झाल्यानंतर लवकरात लवकर हे अतिक्रमण हटविण्यात येईल, असे ठोस आश्वासन दिले. कालांतराने निवडणूक झाली आणि चंद्रकांतदादांच्या रूपाने कोथरूडला एक कर्तव्यदक्ष आमदारही मिळाला. चंद्रकांतदादांनी निवडून आल्यानंतर हे डीपी रोडवरील अतिक्रमण हटवण्यासाठी पाठपुरावा केला, आणि योग्य निर्देश देऊन हे अतिक्रमण तात्काळ हटवण्याची मोहीम पार पडली. या सोसायटीच्या परिसरातील वाहतूक कोंडीची समस्या सुटली आणि नागरिकांनी चंद्रकांतदादांचे मनःपूर्वक आभार मानले. दिलेला शब्द पाळणारा लोकप्रतिनिधी, अशी त्यांची सर्वत्र ख्याती झाली.
कोथरूड विधानसभा मतदारसंघातून यावेळी पुन्हा चंद्रकांतदादा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. गेल्या पाच वर्षात त्यांनी केलेल्या विकासकामांचा आढावा घेतला, तर त्यांनाच पुन्हा निवडून देण्याबाबत या परिसरातील नागरिकांचे ठाम मत असून चंद्रकांतदादांना आशीर्वाद देण्यासाठी मतदार पुढे सरसावणार आहेत. मात्र विरोधकांनीही निवडणुकीची जोरदार तयारी केली आहे. त्यामुळे येथील लढतीकडे सगळ्यांच लक्ष लागून राहिले आहेत.