निवडणूका जवळ आल्या आहेत. महाराष्ट्रात आता महाविकस आघाडी विरुद्ध महायुती असा सामना रंगणार आहे. हे दोन्हीही पक्ष एकमेकांच्या विरोधात ही निवडणूक लढत असल्याने त्यांच्यात वाद निर्माण होताना दिसत आहेत. या दोन्ही पक्षांच्या वेगळ्या भूमिका आहेत. आता कोण होईल महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्री पदाचा चेहरा लवकरच घोषीत करावा अशी मागणी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली होती. यावर शरद पवार यांनी त्यांचे मत व्यक्त केले. निवडणूक झाल्यावर मुख्यमंत्री पद कोणाला द्यायचे हा निर्णयघेतला जाईल, असे शरद पवार यांनी सांगितले.
उद्धव ठाकरे यांना त्यांची लायकी शरद पवारांनी अप्रत्यक्षपणे दाखवली आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपद मिळवण्यासाठी दिल्लीला गेले होते. त्यांनी तेथे सर्व कार्यक्रम व्यवस्थित केले. त्यांचा फक्त मुजरा करणं बाकी होत. शरद पवार यांच्या सारखे ज्येष्ठ नेते अशी भूमिका बजावत असतील तर उद्धव ठाकरे यांचं मुख्यमंत्री पदाच दुकान बंद झालंय, अशी खोचक टीका कणकवलीचे भाजपा आमदार नितेश राणे यांनी केली.