विधानसभा निवडणुका पुढे ढकलल्या आहेत. निवडणुकीच्या तारखा अजून जाहीर झाल्या नाहीत. दिवाळी नंतर निवडणुका होणार असल्याच सांगीतले जाते. निवणुकीच्या या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दौरे सुरु केले आहेत. तेव्हा त्यांनी विदर्भ दौरा करत असताना माध्यमांशी बोलताना काही भावना व्यक्त केल्या.
विधानसभा निवडणुका कधीही होऊ शकतात. त्याबद्दल अजुन काही माहिती समोर आली नाही. मात्र त्याचा अंदाज आम्हाला आलाय आणि म्हणूनच आम्ही महाराष्ट्र दौरे सुरु केलेत. आधी मराठवाड्याचा दौरा केला आणि आता विदर्भाचा दौरा करत आहोत. आम्ही या निवडणुकीला २०० ते २२५ जागांवर उमेदवार उभे करायचे ठरवले आहे असे राज ठाकरे यांनी सांगितले.
सध्या निवडणुकीच्य पार्श्वभूमीवर खूप काही सुरू आहे. राजकीय वातावरण बदलेले दिसत आहे. या आधीही निवडणूका झाल्या मात्र असे गंभीर वातावरण कधीच निर्माण झाले नाही. जनता निवडणूकीत मतदान करते आणि नंतर हेच निवडून आलेले हे लोक विकले जातात. सध्या तर कळतच नाहीये कोण कोणत्या पक्षात आहे. अशी टीका राज ठाकरे यांनी केली.
बदलापूरमध्ये मुलीवर लैगिंक अत्याचार झाले. ही घटना मनसेच्या महिला आघाडीने उघडकीस आणली. येथे लहान मुली देखील सुरक्षीत नाहीत. त्यांच्यावर देखील बलात्कार केले जात आहेत. असे गुन्हे करणाऱ्या नराधमांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात चौरंगाची शिक्षा दिली जात होती. आता पण यांना अशीच शिक्षा द्यायला हवी. “गुन्हेगारांचा चौरंग केला पाहिजे”असे मत त्यांनी मांडले.
कायद्याचा यांच्यावर काहिच धाक नाहीये. पोलिसांना देखील यामध्ये कोणतेच ठोस पाऊल उचलता येत नाही त्यामुळे मी त्यांना दोषी ठरवत नाही. म्हणुन एकदा माझ्याकडे महाराष्ट्राची सत्ता माझ्या हातात देऊन बघा. सर्वांना दाखवून देईन की कायद्याची ताकत काय आहे. कोणीच कोणत्या स्त्रीकडे वाकड्या दृष्टीने बघणार नाही. असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला.