मराठा आरक्षणावर सगळीकडे चर्चा सुरू आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे यांनी महाराष्ट्रात दौरे सुरू केलेत. अजूनही सरकारने आरक्षणाबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही. मराठा आरक्षणावर शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी एक मोठी मागणी केली.
खासदार सुप्रिया सुळे यांनी मिडिया सोबत भाष्य करताना त्यांनी एक प्रस्ताव सादर केला. मराठा आरक्षण प्रस्तावाला राज्य सरकारने मंजुरी द्यावी आणि हा प्रस्ताव केंद्र सरकारला पाठवावा. या प्रस्तावाला मंजुरी देण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व खासदार जोर देऊन हा प्रस्ताव मंजुर करु तसेच याची सर्व जोखीम आम्ही घेणार असे खासदार सुप्रिया सुळे यांनी मिडिया सोबत भाष्य करताना सांगितले.
या संदर्भात सुप्रिया सुळे यांना एक प्रश्न विचारला गेला. या प्रस्तावाला मंजुरी भेटली तर निवडणुकीमध्ये मतांचे विभाजन होणार का? त्यावर त्यांनी असे सांगितले की, या मराठा आरक्षणामुळे मतांचे विभाजन नक्कीच होताना दिसेल. पण आम्ही हे कोणताही वैयक्तीक स्वार्थ साधण्यासाठी किंवा मतांसाठी करत नाही. आम्हाला कोणाला फसवायचे नाही.
त्याच बरोबर प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू हे महाविकास आघाडीत येणार असल्याचे बोलले जात आहे. त्याबाबत सुप्रिया सुळे म्हणाल्या की, बच्चू भाऊ यांनी खूप चांगली कामगिरी केली. तसेच त्यांनी सतत लोकांना खूप मदत केल्याच आपण पाहिले. मात्र आमच्यामध्ये काही राजकीय मनमुटाव आहेत. पण समाजाच्या कल्याणासाठी सर्वानी सोबत येऊन काम करावे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.