मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे सध्या चर्चेत असल्याचे दिसत आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी जोमाने तयारी सुरू केली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते जगभरात शांतता रॅली आणि दौरे करताना दिसत आहेत. या सभेला मनोज जरांगेनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधला आहे.
“छगन भुजबळ यांना जो नेता प्रचाराला घेऊन जाईल त्या पक्षाचा कार्यक्रम लावायचा”, असे विधान त्यांनी काल सोलापूर मधील रॅली मध्ये केले आहे. सोलापूर मध्ये मराठा समाजासाठी ही सभा घेतली होती. बुधवारी ही रॅली असून छत्रपती शिवाजी महाराज चौकात होती. या सभेला देवेंद्र फडणवीस आले होते. छगन भुजबळ पंधरा दिवस झाले दिसले नाही कुठं? असे जरांगे म्हणाले.
राजकीय नेत्यांनी मराठ्यांच्या मुलांना आरक्षण द्यायचे नाही असे ठरवले आहे. मराठ्यांची मुले फक्त त्यांना प्रचार करण्यासाठी, पत्रके चिटकवण्यासाठी हवी आहेत. मराठ्यांना आरक्षण देणार नाही असे दिसत आहे, अशी टिका त्यांनी केली.
आम्ही खूप दिवसांपासून आरक्षण मिळवण्यासाठी लढत आहे. या व्यतिरिक्त आणखी काहीच आम्ही तुमच्या कडून मागितले नाही. मराठा समाजाला आरक्षण द्यावं एवढंच. आम्ही फक्त आमच्या समाजाच्या मुलांच्या हक्कासाठी धडपडतोय. तुम्ही आमच्या समाजाला टार्गेट का करताय? असे त्यांनी म्हटले आहे.