लोकसभा निवडणुक जवळ आल्याने सध्या सगळीकडे खळबळ माजलेली दिसत आहे. राजकीय वातावरणात बदल झालेला आहे. स्वतःच वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी सर्व राजकीय पक्ष प्रयत्न करत आहेत. अशातच शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्यावर गंभीर आरोप केले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी जळगाव आणि रावेर जिल्ह्यात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजपला मदत केल्याचा दावा त्यांनी केला आहे. या दोन्ही लोकसभा निवडणुकीत त्यांनी मदत केली असल्याचे गुलाबराव पाटील यांनी म्हटले. यांच्या या दाव्यामुळे राजकीय वातावरणात खळबळ उडाली आहे. भाजप आमदार मंगेश चव्हाण यांचाही उल्लेख त्यांनी केला.
भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी शरद पवार पक्षाचे माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्यासोबत एक भेट घेतली होती. गुलाबराव देवकर यांनी रावेर लोकसभा निवडणुकीत मदत करणार असल्याने त्यांनी मंगेश चव्हाण यांचा चहा पिला, अशी टिका त्यांनी केली आहे. यामध्ये त्यांनी असेही सांगितले की, मंगेश चव्हाण यांच्या जिल्हा दूध संघाचा चहा गुलाबराव देवकर यांना खूप आवडतो.
गुलाबराव देवकर हे जळगाव लोकसभा निवडणुकीवेळी दिसले नाहीत तर ते फक्त रावेर लोकसभा निडणुकीतच फिरताना दिसले अशी टिका त्यांनी केली. अशातच गुलाबराव पाटील आणि भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांच्यात काही दिवसांपासून वाद निर्माण झालेला दिसत आहे.
राजकारणात मोठी खळबळ! गुलाबराव पाटील यांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट
